भूताटकी?

विराट- अनुष्काच्या घरात भूताटकी? विचित्र हालचालींमुळं तुम्हीही घाबराल

तो स्वगृही परतला

भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली सध्या म्हणे काही खासगी कारणासाठी संघाची साथ सोडून स्वगृही परतला. तिथं विराटची पत्नी अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं.

एक व्हिडीओ समोर

एकिकडे या दोघांसंदर्भातील वेगवेगळी माहिती समोर येत असतानाच आता या जोडीच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

धडकी भरू शकेल

विरुष्काच्या घरातील हा व्हिडीओ पाहताच धडकी भरू शकेल. कारण, या व्हिडीओमध्ये त्यांच्या घरात घडणारा विचित्र प्रकार समोर आला आहे.

कपाटातून एक हात बाहेर आला...

विराट कपाटातून कपडे घ्यायला गेला त्याच क्षणी तिथं कपाटातून एक हात बाहेर आला आणि त्यानं आतील कपडे काढून त्याला दिले. पुढच्याच क्षणी तिथं काहीतरी वेगळं घडतंय याची जाणीव होताच विराटनं वर पाहिलं आणि एक हडळ त्याला दिसली.

घाबरणं अपेक्षित होतं, पण...

खरंतर पाहून विरुष्कानं घाबरणं अपेक्षित होतं. पण, तसं काहीही न होता त्या हडळीलाच बाहेर येता येत नाही हे पाहून विराट अन् अनुष्कानं शून्य प्रतिक्रिया दिली.

चर्चा मात्र प्रचंड...

थोडक्यात ही भूताटकी प्रत्यक्षातील नसून, एका जाहीरातीचाच हा व्हिडीओ असल्याचं इथं लक्षात येत आहे. हो पण, त्याची चर्चा मात्र प्रचंड होतेय हे नाकारता येणार नाही.

VIEW ALL

Read Next Story