विराटचे अनुष्कासोबत रोमॅंटिक सेलिब्रेशन, 'हा विजय तुझ्याशिवाय...'

Published by: Zee Team | Jul 01, 2024

virat Anushka Celebration: टीम इंडियाने T20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकून गेल्या 17 वर्षांचा दुष्काळ संपवला.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

अंतिम सामना जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

आता विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये कोहलीने विश्वचषक जिंकण्याचे श्रेय अनुष्का शर्माला दिले.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये विराटच्या बॅटमधून 76 धावांची उत्कृष्ट खेळी पाहायला मिळाली.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्रामवर अनुष्का शर्मासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यात रोमॅटींक मेसेजही लिहिला.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

'माझ्या प्रिये, तुझ्याशिवाय हे सर्व शक्य झाले नसते. तू मला नम्र, मूळांशी जोडलेला ठेवतेस आणि जे असेल ते पूर्ण प्रामाणिकपणे सांगतेस.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

मी तुझे पुरेसे आभार मानू शकत नाही. हा विजय जितका माझा आहे तितकाच तुझा आहे. आभारी आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू तुझ्यासारखीच आहेस.'

Published by: Zee Team | Jul 01, 2024

संपूर्ण टी-२० विश्वचषकात फॉर्ममध्ये नसलेल्या विराट कोहलीने अंतिम सामन्यात आपल्या बॅटने जबरदस्त कामगिरी केली.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने लवकरच तीन विकेट गमावल्या पण एकीकडे विराट कोहलीने बाजू लावून धरत होता.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

विराट कोहलीने अक्षर पटेलसह भारताच्या डावाची धुरा सांभाळली आणि टीमला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

या सामन्यात कोहलीने 59 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 76 धावा केल्या. या खेळीसाठी तो सामनावीर म्हणूनही निवडला गेला.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

VIEW ALL

Read Next Story