स्मृती मानधना अन् राहुल द्रविड यांच्या बॅटशी कनेक्शन माहितीये का?
टीम इंडियाची लोकप्रिय महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिचा आज म्हणजेच 18 जुलैला वाढदिवस आहे.
सर्वांची नॅशनल क्रश असलेल्या मानधनाने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत
टीम इंडियाकडून द्विशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटर अशी तिची ओळख.
युवराज सिंहसाठी बॅटिंग स्टाईल अन् डावखुरा रुबाब यामुळे स्मृती आज अनेक सामने जिंकवून देतीये.
स्मृतीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड यांनी दिलेल्या बॅटसह पदार्पण केलं होतं.
राहुल द्रविड यांनी स्मृतीच्या भावाला म्हणजेच श्रवणला ऑटोग्राफ देताना बॅट दिली होती.
स्मृती मानधनाने 2013 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. वयाच्या 17 व्या वर्षी तिने बांगलादेशविरुद्ध टी-ट्वेंटी सामना खेळला होता.
थोड्याच काळात तिने उंच झेप घेतली. 2018 मध्ये ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून तिचं नाव घोषित करण्यात आलं होतं.