त्यावेळी अभिषेक नायर (1) आणि हरभजन सिंग (0) यांना 16 व्या ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूंवर आऊट केलेलं. तर 18व्या ओव्हरमध्ये रोहितने जेपी ड्युमिनीला (52) बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली.
दुसरी तिसरी कोणती टीम नव्हे तर रोहितने मुंबई इंडियन्सविरूद्ध हॅट्रिक नोंदवलीये.
डेक्कन चार्जर्सकडून खेळताना रोहित शर्माने हॅट्रिक घेतली होती.
रोहित शर्माच्या फलंदाजीचे कारनामे तुम्हाला माहिती असतील, मात्र रोहितच्या गोलंदाजीबाबत फार कमी लोकांना माहिती असेल.
मुंबई इंडियन्सकडून खेळण्यापूर्वी रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सकडून खेळायचा.
आज 30 एप्रिल म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा वाढदिवस