आयपीएल 2025 साठी नोव्हेंबर महिन्यात मेगा ऑक्शन होणार असून याकरता 31 ऑक्टोबर पर्यंत सर्व संघांना त्यांची रिटेन्शन लिस्ट जाहीर करायची होती.
गुरुवारी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली असून आता मेगा ऑक्शनमध्ये नव्या खेळाडूंना घेण्यासाठी प्रत्येक संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे हे पाहूयात.
पंजाब किंग्सने आयपीएल 2025 साठी त्यांचे दोन खेळाडू रिटेन केले असून आता ऑक्शनसाठी त्यांच्या पर्समध्ये सर्वाधिक 110.5 कोटी रुपये शिल्लक आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 साठी त्यांचे तीन खेळाडू रिटेन केले. यात विराट, यश आणि रजत पाटीदार यांचा समावेश आहे. आता त्यांच्या पर्समध्ये सर्वाधिक 83 कोटी रुपये शिल्लक आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने यंदा 4 खेळाडूंना रिटेन केले असून आता त्यांच्या पर्समध्ये 73 कोटी रुपये शिल्लक आहेत.
लखनऊ सुपर जाएंट्स संघाकडे मेगा ऑक्शनसाठी एकूण 69 कोटी रुपये शिल्लक असून त्यांनी 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे.
चेन्नई सुपरकिंग्सने एम एस धोनी सह 5 खेळाडूंना रिटेन केलं असून त्यांच्या पर्समध्ये आता ऑक्शनसाठी 55 कोटी रुपये शिल्लक आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सने ऑक्शनपूर्वी 6 खेळाडूंना रिटेन केलं असून ऑक्शनसाठी त्यांच्याकडे 51 कोटी रुपये शिल्लक आहेत.
सनराइजर्स हैदराबाद संघाने 5 खेळाडूंना रिटेन केलं असून त्यांच्या पर्समध्ये 45 कोटी रुपये शिल्लक आहेत.
मुंबई इंडियन्सने रोहित, हार्दिक, सूर्यकुमार, बुमराह आणि तिलक यांना रिटेन केलं असून त्यांच्या पर्समध्ये 45 कोटी रुपये शिल्लक आहेत.
राजस्थान रॉयल्सने 6 खेळाडूंना रिटेन केलं असून त्यांच्या पर्समध्ये 41 कोटी रुपये शिल्लक आहेत.