सूर्यकुमार यादव टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि सध्या तो या फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो.

मात्र सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये यश मिळाले नसले तरी, या फलंदाजाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन शतके आणि 16 अर्धशतके झळकावली असली तरी, वनडेमध्ये त्याच्या खात्यात फक्त चार अर्धशतके आहेत.

सूर्याच्या वनडे आणि टी20 च्या आकडेवारीत खूप फरक आहे आणि याबाबत भारतीय संघाचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राने हा फरक नेमका का आहे हे स्पष्ट केले आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात कर्णधार असलेल्या सूर्याने 42 चेंडूत 80 धावा केल्या होत्या. मात्र वर्ल्डकपस्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही.

आकाश चोप्रा सूर्याविषयी म्हणाला, 'सूर्यकुमार टी-20 मध्ये पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा खेळाडू असतो. तिथे तो न थांबणारा बनतो, असे का होते? हे घडते कारण त्यांचा डीएनए पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने सेट केलेला असतो, असे आकाश चोप्रा म्हणाले.

त्याला या फॉरमॅटच्या आवश्यकता समजतात. तो टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील परिस्थितीनुसार खेळतो. इतकंच नाही तर विरोधी संघालाही कळतं आणि मैदानावरील प्लेसमेंटमध्येही ते दिसून येतं,असेही आकाश चोप्रा म्हणाले.

मला वाटतं की खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगले खेळलाच पाहिजे असे नाही. सूर्या फक्त टी-20 क्रिकेटरच राहू शकतो. त्याने पुढील सहा महिने फक्त टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले तर बरे होईल.

मला वाटतं की तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळल्याने आपण आपल्यातील एक टी-20 रॉकस्टारला गमावू शकतो, असेही आकाश चोप्रा म्हणाले.

VIEW ALL

Read Next Story