भारताचं नाव उंचावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नावे अनेक विक्रम, पाहा संपूर्ण यादी
2022 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या डायमंड लीग येथे त्यानं 89.94 मीटर अंतरावर भाला फेकत दुसरं स्थान मिळवलं होतं.
2022 मध्येच ओरेगन येथे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यानं दुसरं स्थान मिळवलं होतं.
2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रमंडळ खेळांमध्ये त्यानं 86.47 मीटरपर्यंत भाला फेकून सुवर्णपदकावर नाव निश्चित केलं होतं.
2017 मध्ये भुवनेश्वर येथे झालेला आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यानं सुवर्णपदक जिंकलं होतं.
वर्ल्ड अंडर 20 चॅम्पियनशिपमध्ये नीरजनं ब्यडगोस्कज येथे 2016 मध्ये 86.48 मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं होतं.
हो ची मीन्ह येथे एशियन ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये 2016 या वर्षी नीरजनं रौप्य पदक जिंकलं होतं.
2016 मध्येच गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये त्यानं सुवर्णपदक मिळवलं होतं.