What is 'Shivshakti Point'?

गुगलवर सर्वजण सर्च करतायत, What is 'Shivshakti Point'?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काय आहे संपूर्ण प्रकरण? भारताच्या एका कामगिरीची जगभरातून दखल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर अनेकांनीच शोधला शिवशक्तीचा अर्थ.

चांद्रयान 3 चंद्रावर

इस्रोनं पाठवलेलं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठावर पोहोचलं आणि भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला. इस्रोचा विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण धुवावर जिथं उतरला त्या ठिकाणाला पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांनी 'शिवशक्ती पॉईंट' असं नाव दिलं.

नावाची फोड

शिवामध्ये अर्थात शंकराच्या अस्तित्वामध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प सामावला आहे. तर, शक्तीमुळं आपल्याला ते संकल्प पूर्ण करण्याचं सामर्थ्य मिळत आहे, असं म्हणत त्यांनी नावाची फोड केली.

शक्तीचा आशीर्वाद

'मनातील या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी शक्तीचा आशीर्वाद गरजेचा आहे. आणि ही शक्ती आपली नारीशक्ती आहे. आपल्या माता, भगिनी याच शक्तीचं प्रतीक आहेत', असंही ते म्हणाले.

नारीशक्तीच्या योगदानाला नमन

पंतप्रधानांनी नारीशक्तीच्या योगदानाला नमन केलं. 'सृष्टी स्थिती विनाशाना, शक्ती भूते सनातनी' म्हणजेच निर्माणापासून प्रलयापर्यंत संपूर्म सृष्टीचा आधार नारीशक्तीच असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

शिवशक्ती पॉईंट

चंद्राचा शिवशक्ती पॉईंट अनेक वर्षांपर्यंत संपूर्ण जगात नारीशक्तीच्या योगदानाची साक्ष देण्यासोबतच येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला विज्ञानाचा वापर मानवतेच्या विकासासाठीच करायचा आहे यासाठीची प्रेरणाही देईल असं पंतप्रधान म्हणाले.

VIEW ALL

Read Next Story