भारत आणि श्रीलंकेदरम्यान मुंबईतील वानखेडे मैदानातील सामन्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर क्लिन बोल्ड झाला.
श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघातील सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरले.
होम ग्राऊण्ड असल्याने रोहित शर्मा दमदार कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती.
रोहितने दिलशान मधुशंकाच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूला चौकार लगावला आणि वानखेडेच्या मैदानात एकच जल्लोष झाला.
रोहित आता मोठी खेळी करणार असं वाटत असतानाच सामन्यातील दुसऱ्या चेंडूवर रोहित क्लिन बोल्ड झाला.
रोहित अशापद्धतीने अनपेक्षितरित्या बोल्ड झाल्याने त्याची पत्नी ऋतिकालाही मोठा धक्का बसला.
रोहित बोल्ड झाल्यानंतर ऋतिकाच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच थक्क करणारे होते.
रोहित शर्मा केवळ 2 चेंडूसाठी मैदानात होता तरी त्याने चौकार लगावत वर्ल्ड कप 2023 मध्ये वैयक्तिक स्तरावर 400 धावांचा टप्पा गाठला.
रोहित हा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या टॉप 5 यादीमध्ये आहे.
मात्र 400 धावांचा टप्पा ओलांडणारा वर्ल्ड कप 2023 मधील रोहित हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 4 धावा करुन बाद झाल्याने रोहितच्या नावावर आता 402 धावा आहेत.