यावर्षी भारतात खेळवली जाणारी वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.

पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला असून, आपला पहिला सराव सामनाही खेळला आहे.

यादरम्यान पाकिस्तान संघाचा उप-कर्णधार शादाब खानने भारतीय जेवण आणि पाहुणचाराचं कौतुक केलं आहे.

ज्याप्रकारे आमचा पाहुणचार केला जात आहे, ते पाहून फार आनंद झाला. जेवणही चांगलं आहे असं शादाबने पत्रकार परिषदेत म्हटलं.

शादाबने म्हटलं आहे की, 'आम्हाला तर वाटत आहे की, आमची चरबी आणि वजन वाढेल. जेवण फार चविष्ट आहे. फार मजा येत आहे'.

"आम्ही फार आनंद घेत आहोत. अहमदाबादमध्ये आम्ही भारताविरोधात खेळत असतानाही असाच अनुभव मिळावा अशी आशा आहे," असं शादाबने म्हटलं आहे.

पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँड्सविरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे.

VIEW ALL

Read Next Story