'मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे की...'; Ind v SL मॅचदरम्यान धनश्रीची Insta स्टोरी

Swapnil Ghangale
Nov 03,2023

चहल आणि धनश्रीची उपस्थिती

भारत आणि श्रीलंकेदरम्यान गुरुवारी मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात झालेल्या सामन्यासाठी फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्माही प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती.

अनेकांचं लक्ष वेधलं

धनश्री आणि चहलच्या फोटोंनी सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं.

चहल मोबाईलमध्ये व्यस्त

कॅमेरा या दोघांवर गेला तेव्हा अनेकदा चहल मोबाईलमध्ये बघत होता तर धनश्री त्याच्या बाजूला बसली होती.

दोघांचे फोटो चर्चेत

धनश्री आणि चहलचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

सामन्याला निघाल्यानंतरचा मिरर सेल्फी

धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही सामन्याला जाण्याआधीचा चहलबरोबरचा मिरर सेल्फी फोटो शेअर केला होता.

मैदानातील सेल्फीही केला पोस्ट

धनश्रीने मैदानामध्ये चहलबरोबर क्लिक केलेला सेल्फीही इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला.

श्रेयसच्या सिक्समुळेही चर्चेत

श्रेयस अय्यरने मारलेला 106 मीटरचा षटकार धनश्री अन् चहल बसलेल्या स्टॅण्डमध्ये पडला. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

अनेकांच्या भूवया उंचावल्या

मात्र याचदरम्यान धनश्रीने सामना सुरु असतानाच एक सूचक पोस्टही शेअर केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.

ते वाक्य केलं शेअर

या पोस्टमध्ये एक हॉलवूडमधील प्रसिद्ध कलाकार केनू रेव्हिसचं एक वाक्य दिसत आहे. हे वाक्य अगदी परफेक्ट असल्याचं धनश्री म्हणाली आहे.

धनश्री म्हणते अगदी योग्य

मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे की मी चर्चेमधून बाहेरच राहू इच्छितो. तुम्ही 1+1=5 म्हणालात तरी मी होय म्हणेन, असं वाक्य असलेलं कार्ड अगदी योग्यच आहे हे म्हणत धनश्रीने शेअर केलं आहे.

आज होणार कार्यक्रमात सहभागी

धनश्री आज मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असून यासंदर्भातील एक इन्स्टाग्राम स्टोरीही तिने पोस्ट केली आहे.

नेमकं म्हणायचंय काय?

आता या चर्चेत नको म्हणणाऱ्या पोस्टमधून धनश्रीला नेमकं काय सांगायचं आहे आणि ती कोणत्या चर्चेतून बाहेर राहू इच्छिते हे तिचं तिला ठाऊक, असेच सध्या म्हणावं लागेल.

इन्स्टाग्राम स्टोरीही चांगल्याच व्हायरल

धनश्री आणि चहलचे वानखेडेवरील फोटो चर्चेत असतानाच धनश्रीच्या या सामन्याच्या दिवसाच्या इन्स्टाग्राम स्टोरीही चांगल्याच व्हायरल झाल्यात.

VIEW ALL

Read Next Story