'मी नशिबवान आहे की...'; विराटवर फिदा झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पत्नीची Insta Story चर्चेत

भारत फायलनमध्ये

भारताने वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

विराटचं विक्रमी शतक

न्यूझीलंडविरुद्धची सेमी-फायनल भारताने जिंकली. याच सामन्यात विराटने विक्रमी शतक झळकावलं.

सचिनचा विक्रम मोडला

विराट कोहलीने मुंबईतील वानखेडे मैदानात 50 वं शतकं झळकावत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

विराटवर कौतुकाचा वर्षाव

विराटवर या कामगिरीसाठी कौतुकाचा वर्षाव होत असून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे.

खेळाडूची पत्नीही पडली विराटच्या प्रेमात

असं असतानाच दुसरीकडे आज सेमीफायलन खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूची पत्नीही विराटच्या खेळीच्या प्रेमात पडलीय.

मेसेजसहीत स्टोरी पोस्ट केली

विराटच्या विक्रमी शतकानंतर स्वत: क्रिकेटपटू असलेल्या या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर विशेष मेसेजसहीत स्टोरी पोस्ट केली आहे.

या महिलेचं नाव आहे

विराटसाठी स्टोरी पोस्ट करणाऱ्या या महिलेचं नाव आहे एलिसा हीली!

स्वत: क्रिकेटपटू

एलिसा ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू आहे. तसेच ती ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आहे.

विराटची मोठी चाहती

एलिसा ही विराट कोहलीची फार मोठी चाहती आहे.

विराटसाठी विशेष इन्स्टाग्राम स्टोरी

विराटच्या 50 व्या शतकानंतर एलिसाने इन्स्टाग्रामवर त्याच्यासाठी विशेष स्टोरी ठेवत स्वत:लाच लकी म्हटलं आहे.

विराटसाठीचा संदेश काय?

"मी स्वत:ला फार नशिबवान समजते की मी असा पिढीमधील आहे जिने विराट कोहलीला खास गोष्टी करताना प्रत्यक्षात पाहिलं आहे," असं वाक्य एलिसाने इन्स्टाग्राम स्टोरीला विराटच्या फोटोसहीत ठेवलं आहे.

अनेक जेतेपद जिंकलेल्या संघाचा भाग

एलिसा ही स्वत: ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातून खेळताना अनेकदा विश्वविजेते पद जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिली आहे.

अनेकांचं लक्ष वेधलं

पती मिचेलविरुद्धच्या संघात खेळणाऱ्या विराटसाठी एलिसाने ठेवलेली ही इन्स्टाग्राम स्टोरी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

VIEW ALL

Read Next Story