अशी ही पॉवरपॅक खेळाडू येत्या काळात नेमकी कशा पद्धतीनं क्रिकेट जगतात आपली छाप सोडते हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
WPL मध्ये कनिकावर बंगळुरूच्या संघाकडून 35 लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती.
पटियालास्थित झिल गावात असणाऱ्या क्रिकेट हब अकॅडमीतून तिनं खेळाचं प्रशिक्षण घेतलं आहे.
पटियाला येथे जन्मलेली कनिका पंजाबच्या महिला संघाकडून क्रिकेट खेळते.
मागील वर्षी खेळल्या गेलेल्या वूमन्स ODI ट्रॉफीमध्ये तिनं भारतीय संघासाठी कमाल खेळाचं प्रदर्शन केलं होतं.
दमदार फलंदाजी करण्यासोबतच ती प्रभावी गोलंदाजीसाठीसुद्धा ओळखली जाते.
सामन्यामध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या कनिका अहूजा या खेळाडूला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आलं. तिनं 30 चेंडूंमध्ये 46 धावांची खेळी केली होती.