सेकंड हॅन्ड iPhone खरेदी करताना 'या' गोष्टी नीट चेक करुन घ्या नाही तर फसाल

आजकाल आयफोनला प्रचंड मागणी असून हा सर्वात महागडा स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो.

जर तुम्ही सेकंड हॅन्ड आयफोन घेऊ इच्छित असाल तर कोणत्या सात गोष्टी लक्षात घ्याव्यात ते पाहूयात.

IMEI किंवा सिरीयल नंबर

सेकंड हॅन्ड आयफोन खरेदी करताना त्याच्या IMEI किंवा सिरीयल नंबरची तपासणी करावी. कोणी चोरीचा मोबाईल आपल्याला विकलेला आहे का ? या बद्दल माहिती मिळवता येते.

अ‍ॅक्टिव्हेशन लॉक स्टेटस

मोबाईलचा अ‍ॅक्टिव्हेशन स्टेटस लॉक नाही ना, याची खात्री करुन घ्या. त्यासाठी मालकाचा अ‍ॅप्पल आयडी आणि पासवर्ड महत्त्वाचा आहे. तुम्ही iCloud Activation lock staus या साईटवरुन मोबाईल बद्दल माहिती काढू शकता.

मोबाईलची स्थिती

मोबाईल सेकंड हॅन्ड खरेदी करताना तो चांगला चालतोय का, त्याला स्क्रॅच, डेंट्स किंवा क्रॅक येणं असं कोणतंही नुकसान झालेलं नाही ना, हे तपासून घ्या.

बॅटरी लाईफ

बॅटरी चार्ज होण्यासाठी किती वेळ लागतो आणि चार्जिंग किती वेळात संपते, हे तपासून घेणं गरजेचं आहे.

इंटरनल सिस्टिम

आयफोन हा वॉटर प्रुफ नाही. म्हणूनच पाण्यामुळे त्याचं कोणतंही नुकसान झालेलं नाही ना, हे नीट माहित करुन घ्या.

फिचर तपासून घेणं

आयफोनची टच आयडी, फेस आयडी त्याचबरोबर स्पीकर, कॅमेरा आणि अ‍ॅप्स बरोबर चालू आहेत का? हे माहित करुन घ्या.

वॉरंटी कव्हरेज

तुम्ही आयफोन Apple किंवा AppleCare+ खरेदी करणार असाल तर त्याचं वॉरंटी कव्हरेज पाहणं महत्त्वाचं आहे.

VIEW ALL

Read Next Story