मोबाइलमध्ये मिळणार सर्व माहिती

कंपनीने या सायकलसाठी एक डेडिकेटेड अॅप डेव्हलप केलं आहे. हे अॅप सायकलची सर्व माहिती देतं. तसंच सायकल चोरी होण्यापासून रोखण्यासही मदत करतं.

2.5 तासात बॅटरी फूल चार्ज

सायकलच्या फ्रेममध्येच बॅटरीला जागा देण्यात आली असून, 2.5 तासात बॅटरी फूल चार्ज होते. महत्वाचं म्हणजे याच्या पॉवर ब्रेकचा वापर मोबाइल आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठीही केला जाऊ शकतो.

110 किमीची रेंज

या सायकलचा टॉप स्पीड ताशी 70 किमी आहे. तसंच ड्रायव्हिंग रेंज 110 किमीची आहे.

सायकलचं वजन फक्त 16 किलो

ही इलेक्ट्रिक सायकल रस्त्याच्या स्थितीचा आढावा घेत आपोआप गेअरही बदलते. या सायकलचं वजन फक्त 16 किलो असून बाजारात उपलब्ध इतर इलेक्ट्रिक सायकलच्या तुलनेत हलकी आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुविधा

ही इलेक्ट्रिक सायकल शहरांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. तसंच यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सुविधा देण्यात आल्या आहेत.

ACER लाँच करणार इलेक्ट्रिक सायकल

ACER आपली नवी इलेक्ट्रिक सायकल ACER ebii ला लाँच करण्याची तयारी करत आहे.

VIEW ALL

Read Next Story