भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये सध्या इलेक्ट्रीक कारना अनेकांचीच पसंती मिळत असून, काही कंपन्या आता कॉम्पॅक्ट डिझाईनच्या कार तयार करत आहेत. एमजीची कॉमेट हे त्याचच एक उदाहरण.
याच शर्यतीत लिगियर (Ligier) ही फ्रेंच कंपनीसुद्धा उतरली असून, त्यांनी सर्वात लहान Myli कारची चाचणी सुरू केली आहे. भारतीय रस्त्यांवर ही कार सध्या पाहिली जात असून, युरोपात तिची विक्रीसुद्धा सुरू झाली आहे.
2958 मिमी लांबी, 1499 मिमी रुंदी आणि 1541 मिमी उंची असणारी ही कार टाटा नॅनोहून लहान असल्याचं सांगण्यात येतं. ज्यामुळं कारच्या पार्किंगसाठी जास्त जागा लागणार नाही हे स्पष्ट. या कारला बॉक्सी बोनेट आणि प्लास्टिक क्लॅडिंग आहे.
मागच्या बाजूला मोठं विंडशील्ड असणाऱ्या या कारमध्ये टचस्क्रीन इंफोटेन्मेंट प्रणाली आहे. शिवाय पॉवर स्टिअरिंग, क्लायमेट कंट्रोल, हिटेड ड्रायव्हर सीट, मॅन्युअल एसी असे फिचर्स कारमध्ये आहेत.
63 किमी, 123 किमी आणि 192 किमी अशा विविध बॅटरी बॅकअपसह ही कार उपब्ध आहे. 8 विविध रंगांमध्ये ग्लेशिअर व्हाईट, डामर ग्रे, पर्लसेंट व्हाईट, इंटेंस ब्लॅक, ग्रफाईट ग्रे, टोलॅडो रेड मेटालिक, रीफ ब्लू याच त्या शेड.
भारतीय बाजारपेठेत लिfगियर मायली कधी सादर केली जाणार याची अद्यापही अधिकृत तारीख समोर आलेली नाही. असं असलं तरीही ही कार मार्केटमध्ये आल्यास ती अनेक कॉम्पॅक्ट कारना टक्कर देईल हे मात्र नक्की.