Vivo T1

या फोनचा 120Hz refresh rate display आहे. त्यासोबतच आपल्याला खूप चांगली बॅटरी लाइफ या फोनच्या माध्यमातून आपल्याला मिळते. 20 हजार रुपयांच्या आत घेत असलेल्या फोनमध्ये एक उत्तत ऑप्शन आहे. तर फोनची किंमत ही 14 हजार 499 अशी आहे. (All Photo Credit : File Photo)

Motorola Moto G71

या फोनचा AMOLED डिस्प्ले आहे. फास्ट चार्जिंग हे त्याचं एक फिचर आहे. वापरण्यासाठी हा फोन खूप सोपा आहे. त्याचं फिंगरप्रिंट स्कॅनर हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं. दरम्यान, या फोनची किंमत ही 16 हजार 999 रुपये इतकी आहे.

Poco X4 Pro 5G

या फोनची डिझाइन ही खूप सुंदर आहे. खूप चांगली बॅटरी लाइफ आणि फास्ट चार्जिंगची सोय यात आहे. रेडमी नोट 11 Pro+ प्रमाणेच या फोनचा स्पिकर खूप चांगला आहे. तर या फोनची किंमत ही 18 हजार 999 रुपये इतकी आहे.

Redmi Note 11 Pro+ 5G

हा फोन फक्त दिसायला चांगला नाही तर त्यासोबत खूप चांगल्या प्रकारे काम देखील करतो. उत्तम डिस्प्ले आणि अप्रतिम स्पिकर याची खासीयत आहे. या फोनमध्ये खूप चांगले फोटो येतात, त्यासोबत डस्ट आणि वॉटर रिझिस्टंट देखील आहे. या फोनची किंमत ही 19 हजार 316 रुपये इतकी आहे.

Realme 9 5G SE

Realme 9 या फोनचा डिस्प्ले खूप चांगला आहे. यासोबतच बॅटरी बॅकअप आणि फास्ट चार्जिंग अशा दोन महत्त्वाचे फिचर आहेत. तर या फोनची किंमत ही 18 हजार 690 रुपये ते 18 हजार 999 रुपये इतकी आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G

वनप्लसचा हा फोन देखील 6 जीबी आणि 8 जीबी रॅमच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनची खूप चांगली बॅटरी बॅकअप असून 33W फास्ट चार्जिंग आहे. तर या फोनची किंमत ही 18 हजार 999 रुपये इतकी आहे.

Moto G82 5G

या फोनचा प्रायमरी कॅमेरा हा 50 मेगा पिक्सल्सचा आहे. तर हा फोन 6 जीबी आणि 8 जीबी रॅमच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तर ट्रिपल रेअर कॅमेरा हा सगळ्यात मोठं आकर्षक आहे. तर हा फोन अॅन्डॉइंड 12 व्हरजंच आहे. आज 7 एप्रिल पर्यंत या फोनची किंमत 19 हजार 999 रुपये इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story