मोबाईलमधील जंक फाईल्स काढून त्या स्वच्छ करण्यासाठी अनेकजण क्लीनिंग अॅप इन्स्टॉल करत असतात. परंतु हे बनावट अॅप तुमच्याकडून अनेक परवानग्या मागून तुमची सर्व माहिती चोरतात.
स्मार्टफोनवर वेगळे कीबोर्ड अॅप कधीही इन्स्टॉल करू नका. जर तुम्ही बनावट अॅप टायपिंगच्या वेळी तुमचे पासवर्ड चोरतात आणि तुमची आयुष्यभराची कमाई डोळ्याच्या झटक्यात चोरू शकतात.
फ्लॅश लाइट अॅप चुकूनही इन्स्टॉलही करू नका. कारण असे अॅप तुमची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती चोरू शकतात.
तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्याही प्रकारचे अँटी व्हायरस अॅप इन्स्टॉल करू नका. जरी ते मोफत असले तरी असे अॅप लोकांचा डेटा चोरतात.
इंटरनेटमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण मोबाईलमधल्या अॅपमुळे तुमचे खाते एका मिनिटात रिकामे होऊ शकते. कारण अशी अनेक बनावट अॅप्स आहेत जी बँक खात्यातील पैसे गायब करत आहेत.