सायबर क्राइम आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्याच्या उद्देशाने DoT ने हे पाऊल उचललं आहे. हे नंबर या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचं आढळलं आहे.
टेलिकॉम डिपोर्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, हे 24 हजारांपेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन 42 युनिक IMEI क्रमांकाशी जोडलेले होते. या मोबाईल क्रमांकाचा गुन्हेगारीसाठी वापर होत असल्याचा संशय होता.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 42 IMEI क्रमांक तीन मोबाईल क्रमांकाशी जोडलेले होते. DoT ने या 42 IMEI क्रमांकांना ब्लॉक करण्याचा आदेश सेवा पुरवठादारांना दिला आहे.
सरकारने सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आलेलं हे ऑनलाइन पोर्टल आहे. यावर कोणीही सायबर फसवणुकीशी संबंधित तक्रार करु शकतं.
sancharsaathi,gov.in पोर्टलवर जाऊन तुम्ही तक्रार करु शकता. तुम्ही फोन, व्हॉट्सअप किंवा एसएमएसच्या माध्यमातूनही तक्रार करु शकता.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, DoT ने 10,834 क्रमांकांना पुन्हा व्हेरिफिकेशन करायला सांगितलं आहे.