आपण घरी असो की शाळा-महाविद्यालयात, किंवा कार्यालयात असो. दैनंदिन व्यवहारात आपण अनेक इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर करतो.
आपण साधारण दररोज बँकेत जातो. पण बँकेला मराठीत काय म्हणतात माहित आहे. बँकेला मराठीत अधीकोष असं म्हणतात.
रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण यातल्या किती जणांना रेल्वेला मराठीत काय म्हणतात हे माहित असेल. रेल्वेला मराठीत अग्निरथ किंवा अगीनगाडी असं म्हणतात.
भारतात क्रिकेटला हा खेळा प्रचंड लोकप्रिय आहे. क्रिकेटला मराठीत चेंडूफळी असं म्हटलं जातं.
आपण रोज वापरत असलेल्या इंटरनेटला मराठीत आंतरजाल असं म्हणतात.
कॅल्क्युलेटरला मराठीत गणन यंत्र आणि हिंदीत परिकलक म्हणतात.
सिगारेटचं व्यसन हे आरोग्यसाठी धोकादायक आहे. पण तुम्हाला माहित आहे सिगारेटला मराठीत धुम्रपानकांडी असं म्हटलं जातं.