ACTIVA ची Electric स्कूटर अखेर आली समोर; सिंगल चार्जमध्ये इतकी KM धावणार

Shivraj Yadav
Nov 18,2024

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट आता वेगाने वाढत आहे. दरम्यान अनेकजण होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिकची वाट पाहत आहेत.

होंडा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नव्या स्कूटरचा टीझर जारी करत आहे. 27 नोव्हेंबरला स्कूटर लाँच केली जाणार आहे.

दरम्यान एका टीझरमधून या स्कूटरच्या रेंजसंबंधी संकेत मिळाले आहेत. ज्याची ऑटो क्षेत्रात चर्चा रंगली आहे.

नव्या टीझरमध्ये स्कूटरचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर दाखवण्यात आला आहे. यामध्ये 104 ची रेंज दाखवण्यात आली आहे. यावरुन ही स्कूटर 104 ची रेंज देईल असा अंदाज लावला जात आहे.

याशिवाय स्क्रीन पाहून यामध्ये वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स, म्युझिक, नेव्हिगेशन, ब्लूट्यूथ कनेक्टिव्हिटी सुविधा मिळणार असल्याचं दिसत आहे.

येथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे इंस्ट्रूमेंट क्लस्टर दाखवण्यात आले आहेत. एक TFT आणि दुसरा LCD स्क्रीन आहे. यावरुन ही स्कूटर दोन व्हेरियंटमध्ये असेल असा अंदाज लावला जात आहे.

याच्या हायर व्हेरियंटमध्ये TFT डिस्प्ले मिळेल. यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह ऑन-बोर्ड नेव्हिगेशनसारखे फिचर्स दिले जातील.

नुकतंच कंपनीने इटलीमध्ये आयोजित EICMA मोटर शोदरम्यान इलेक्ट्रिक स्कूटरला शोकेस केलं होतं.

सर्वसामान्यांसाठी ही स्कूटर असल्याने तिची किंमत परवडणारी असेल अशी शक्यता आहे. तसंच यात दोन बॅटरी असतील असाही अंदाज आहे.

VIEW ALL

Read Next Story