Personality Test : बघा हं, तुम्ही मोबाईल कसा पकडता यावरूनही कळतं तुमच्या मनात दडलंय काय
हातात मोबाईल नाही, अशी एखादी व्यक्ती फार क्वचितच दिसेल. कारण, हल्ली प्रत्येकाच्याच हातात हा मोबाईल दिसणं ही जणू जगण्याचा भाग झाली आहे.
माईंड जर्नलमधील एका आर्टिकलनुसार जर तुम्ही एका हातानं मोबाईल पकडताय तर तुम्ही एक आनंदी आणि मनमिळाऊ व्यक्ती आहात.
एका हातानं फोन पडकणाऱ्या व्यक्ती सहसा त्यांच्या साचेबद्ध आयुष्यातून आणि कोषातून बाहेर पडण्यासाठी ओळखल्या जातात. ही मंडळी करिअरमध्ये यशस्वी होतात.
दोन्ही हातात फोन पकडून त्यावर एकाच अंगठ्यानं स्क्रोल करणारी मंडळी त्यांच्या वाट्याला येणाऱ्या कामांप्रती सतर्क असतात.
अशा मंडळींना सहसा करिअरमध्ये धोका पत्करण्यापेक्षा आराखडा तयार करून निर्णय घेताना पाहिलं जातं. ही मंडळी इतरांची काळजी घेतात.
दोन्ही हातांनी मोबाईल पकडून त्यावर दोन्ही हातांनी टाईप करणारी मंडळी परिस्थितीशी एका क्षणात एकरुप होतात. कुठंही जातील तिथं ही मंडळी त्यांची छाप सोडतात. अनेकांच्याच मनात क्षणात घर करतात आणि त्यांच्या एकनिष्ठेसाठी ओळखले जातात.
एकाच हातात फोन पडकून दुसऱ्या हाताच्या पहिल्या बोटानंच तो सर्रासपणे वापरणारे व्यक्ती कल्पक आणि कलात्मक असतात.
गर्दीत असूनही एकटेपणात अधिक आनंदी असणं हा तुमच्या स्वभावाचा भाग असतो. तुमच्या कलात्मकतेचा अशाच पद्धतीनं वाव मिळतो. काय मग? तुम्ही कसा फोन पकडता? तुमच्या समोरच्या व्यक्तीनं कसा फोन पकडलाय? पाहा जरा...(सर्व छायाचित्र- फ्रीपिक)