जगभरातील सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग Application म्हणून व्हॉट्सअपकडे पाहिलं जातं.
व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स, पैसे पाठवणं अगदी सहज शक्य आहे.
मात्र व्हॉट्सअपवर अनेकदा मेसेज करुनही तुम्हाला समोरची व्यक्ती रिप्लाय करत नसेल तर तिने तुम्हाला ब्लॉक केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेकांना तर त्यांना व्हॉट्सअपवर समोरच्या ब्लॉक केलं आहे हेच समजत नाही.
म्हणूनच आपण इथे काही टीप्स पाहणार आहोत ज्या माध्यमातून व्हॉट्सअपवर एखाद्या आपल्याला ब्लॉक केलं आहे की नाही हे समजू शकतं.
तुम्हाला व्हॉट्सअपवर एखाद्या व्यक्तीचं लास्ट सीन दिसत नसेल तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
एखाद्याचा नंबर तुमच्याकडे सेव्ह आहे पण त्याचा व्हॉट्सअप बायो अथवा डीपी दिसत नसेल तर त्याने तुम्हाला ब्लॉक केलं आहे असं समजावं.
व्हॉट्सअपवर तुम्हाला एखाद्याचं नंबर सेव्ह असूनही स्टेटस दिसत नसेल तर तुम्हाला ब्लॉक करण्यात आलं आहे असं समजावं.