मोबाईल सुरु झाल्यावर लगेच मोबाईलमधील डेटाचं बॅकअप घेऊन घ्या. कारण पाणी गेल्याने मोबाईलचे काही पार्ट खराब होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईचा डेटा नेहमीसाठी गमावू शकता.
मोबाईला सुकवण्यासाठी त्याचं बॅक पॅनल उघडून त्याला उन्हातही ठेवू शकता. उन्हात मोबाईलमधील पाणी लवकर सुकेल. पण, मोबाईल जास्तवेळ आणि कडक उन्हात ठेवू नका. त्यामुळे मोबाईलमधीन प्लास्टिक कम्पोनेंट वितळू शकतात.
त्यानंतर मोबाईला तांदळाच्या डब्ब्यात ठेवा आणि झाकण घट्ट लावून घ्या. तांदळाचे दाणे मोबाईलमधील ओलावा शोषूण घेतील. माबोईलला 24-48 तासांपर्यंत तांदळाच्या डब्ब्यात ठेवा.
मोबाईल ऑफ केल्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या.त्यानंतर त्याला टिशू किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा. जेणेकरुन मोबाईलमध्ये गेलेलं पाणी सुकण्यात मदत होईल. त्यानंतर मोबाईलमधून सिम कार्ड आणि मेमोरी कार्ड काढून घ्या आणि मोबाईला झटका.
मोबाईल पाण्यात पडला तर लगेच त्याला स्वीच ऑफ करा.ओला झालेला मोबाईल वापरणे धोकादायक ठरु शकते. कारण पाण्याने तुमच्या मोबाईलच्या सर्किटला नुकसान होऊ शकतं आणि तुमचा मोबाईल नेहमीकरिता खराब होऊ शकतो.