भारतात Telegram कायमचं बंद होणार?

टेलिग्राम अॅपसंबंधी तपास

भारत सरकार प्रसिद्ध अॅप टेलिग्रामसंबंधी तपास करणार आहे. यामध्ये अॅप आणि त्याच्याशी संबंधित गुन्हेगारी घडामोडींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ज्यामध्ये खंडणी, जुगार यांचा समावेश आहे.

टेलिग्रामचा संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरोव (Pavel Durov) याच्या अटकेनंतर हा तपास केला जात आहे.

जर तपासात दोषी आढळले तर अॅपवर बंदी घातली जाऊ शकते अशी माहिती आहे.

केंद्राकडून तपास

भारतात गृह मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) द्वारे हा तपास केला जाऊ शकतो.

टेलीग्रामचे भारतात सुमारे 5 दशलक्ष नोंदणीकृत युजर्स आहेत. यावरुन ते किती मोठ्या प्रमाणात वापरले जाते हे स्पष्ट होतं.

चौकशी अहवालाची प्रतिक्षा

भारत सरकारच्या तपासाचं मुख्य लक्ष Peer-To-Peer (P2P) संभाषणांवर असेल. तसंच येथील बेकायदेशीर घडामोडींकडे लक्ष दिलं जाईल. वृत्तानुसार, चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

इलॉन मस्कसह अनेकांचं समर्थन

टेलिग्राम मेसेजिंग ॲपचा संस्थापक आणि सीईओ पावेल ड्यूरोवला शनिवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. इलॉन मस्कसह अनेक लोक त्याच्या समर्थनार्थ पुढे आले आणि काहींनी विरोधही केला.

VIEW ALL

Read Next Story