सिंगल चार्जमध्ये 500KM...; पेट्रोल स्कूटर विसरुन जाल; 'या' आहेत बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर

Oct 31,2023


भारतीय बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळेच बाजारात जबरदस्त रेंज असणारे अनेक मॉडेल्स लाँच झाले आहेत.

अशाच काही इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्तच नाही तर जास्त ड्रायव्हिंग रेंजही देतात.

Simple One

बंगळुरु स्थित स्टार्टअप सिंपल एनर्जीने Simple One मध्ये 4.8kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. ही स्कूटर 212 किमीची रेंज देते असा दावा आहे. हिचा टॉप स्पीड ताशी 105 किमी आहे. हिची किंमत 1.45 लाख आहे.

Ola S1 Pro

Ola S1 Pro च्या सेकंड जनरेशन मॉडेलमध्ये कंपनीने 4kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 195 किमीची रेंज देते असा दावा आहे. हिचा टॉप स्पीड ताशी 120 किमी आहे. तसंच किंमत 1 लाख 40 हजार आहे.

Vida V1 Pro

हिरो मोटोकॉर्पची इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 Pro मध्ये 3.94kWh चा बॅटरी पॅक मिळतो. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 165 किमी रेंज देते. हिचा टॉप स्पीड ताशी 80 किमी असून, किंमत 1 लाख 46 हजार आहे.

Okhi 90

ओकिनावाची इलेक्ट्रिक स्कूटर Okhi 90 मध्ये कंपनीने 3.08kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. हिचा टॉप स्पीड ताशी 90 किमी असून, सिंगल चार्जमध्ये 160 किमी रेंज देते. हिची किंमत 1 लाख 86 हजार आहे.

Faast F4

बॅटरीची निर्मिती कऱण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ओकायाच्या Faast F4 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4.4kWh चा ड्युअल बॅटरी सेटअप देण्यात आला आहे. ही स्कूटर 160 किमींपर्यंत रेंज देते. हिचा टॉप स्पीड ताशी 70 किमी असून किंमत 1 लाख 33 हजार आहे.

Ather 450X

अथर एनर्जीच्या Ather 450X मध्ये कंपनीने 3.07kWh चा बॅटरी पॅक दिला आहे. ही स्कूटर 140 किमीची रेंज देते असा दावा आहे. हिचा टॉप स्पीड ताशी 90 किमी आहे. या स्कूटरसाठी 1 लाख 35 हजार मोजावे लागतील.

Rivot NX100

कर्नाटकमधील स्टार्टअप रिव्होट मोटर्सने देशातील पहिली अपग्रेडेड बॅटरी स्कूटर लाँच केली आहे. यामध्ये 5.6kWh चा बॅटरी पॅक मिळतो. ही स्कूटर 280 किमी रेंज देते असा कंपनीचा दावा आहे, जी 500 किमीपर्यंत वाढवू शकता. या स्कूटरसाठी 1 लाख 89 हजार मोजावे लागतील.

VIEW ALL

Read Next Story