मागील काही वर्षांपासून देशभरातील ऑटो सेक्टर झपाट्यानं प्रगती करत असून, यामध्ये आघाडीवर असणारी कंपनी म्हणजे टाटा मोटर्स.
टाटाच्या याच अधिपत्याला आता आव्हान देणार आहे ती म्हणजे मारुतीची नवी कार. सध्या कंपनीकडून आपल्या पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक कारला लाँच करण्यासाठीची तयारी सुरु करण्यात आली आहे.
कंपनीकडून सध्या नेक्सा डिलरशिपवर चार्जर इंस्टॉल करण्यात आली असून, त्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
Maruti eVX असं या नव्या इलेक्ट्रीक मॉडेलचं नाव असून, सध्या ऑटो सेक्टरमध्ये या कारची बरीच चर्चा सुरू आहे.
कंपनीकडून 60 kWh ची बॅटरी देण्यात येणार असून, एकाच चार्जिंगमध्ये ही कार 500 किमी पर्यंतचं अंतर ओलांडते.
विविध आर्थिक गटांना केंद्रस्थानी ठेवत कंपनीकडून या कारचे सिंगल मोटर आणि ड्युअल मोटर असे व्हेरिएंट सादर केले जाणार आहेत. अशा या कारमध्ये बेसिक कार फिचरसह इतरही अनेक फिचर दिले जाणार आहेत. त्यामुळं ही कार नेमकी कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.