49 कोटी युजरबेससह जिओ कंपनी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे. जिओ आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्त प्लान्स ऑफर करते.
जिओकडे वेगवेगळ्या किंमतीचे डेटा, कॉलिंग आणि ओटीटी बेनिफिट्स देणारे रिचार्ज प्लान्स आहेत.
जिओ यूजर्ससाठी जास्त वॅलिडीटीसोबत डेटा ऑफर करणारे प्लान्स जाणून घेऊया.
जिओने काही दिवसांपुर्वी 999 रुपयांच्या प्लानमध्ये प्रीपेड रिचार्ज प्लान आणला होता.
यामध्ये 98 दिवसांची म्हणजेच साधारण 100 दिवसांची वॅलिडीटी देण्यात आली आहे.
यात 98 दिवस फ्री एसटीडी आणि लोकल कॉल्स आणि 100 फ्री एसएमएस मिळतील.
यामध्ये तुम्हाला 196 जीबी हायस्पीड इंटरनेट डेटा म्हणजेच रोज 2जीबी डेटा मिळेल.
डेली लिमिट संपल्यानंतर तुम्हाला 64 केबीपीएस इंटनेट स्पीड मिळेल. यात तुम्ही मोफत 5जी वापरु शकता.
ओटीटी स्ट्रिमिंगसाठी फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. तसेच जिओ टीव्ही, जिओ क्लाऊडचा मोफत एक्सेस मिळेल.