मुंबईतील GoGoA1 या EV स्टार्ट-अप कंपनीने खास जुन्या बाईकसाठी हे इलेक्ट्रीक कीट लाँच केले आहे.
RTO ने या किटला मंजुरी दिली आहे. यामुळे 50 पेक्षा जास्त बाईक इलेक्ट्रीकमध्ये कन्व्हर्ट करता येणार आहेत.
Hero MotoCorp आणि Honda Motorcycle & Scooter India सारख्या ब्रँडच्या 45 हून अधिक मॉडेल्ससाठी हे किट तयार करण्यात आले आहे.
बाईकसह Honda Activa स्कूटरचे 5 प्रकार देखील EV मध्ये कनव्हर्ट करता येणार आहेत.
हे किट टू-व्हीलरमध्ये बसवल्यानंतर फुल चार्जिंगमध्ये 151 किमीपर्यंतची रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.
या किटमध्ये इंजीन, बॅटरी तसेच इतर पार्टमध्ये बदल केले जातात. किट बसवल्यानंतर तीन वर्षांची वॉरंटी दिली जाते.
हे किट बसवण्यासाठी 60,500 रुपये इतका खर्च येतो. यामध्ये बॅटरी आणि चार्जर यांच्या किमतींचा समावेश आहे.