OLA ची मोठी खेळी; फक्त 39 हजारांत लाँच केली दमदार इलेक्ट्रिक स्कूटर

Shivraj Yadav
Nov 27,2024

ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत नवी स्कूटर रेंज Gig आणि S1 Z लाँच केली आहे.

या नव्या इलेक्ट्रिक स्कटूर रेंजची सुरुवातीची किंमत 39 हजार 999 रुपये (एक्स-शोरुम) आहे. या स्कूटरची अधिकृत बुकिंग सुरु करण्यात आली आहे. फक्त 499 रुपयांत ही स्कूटर बूक करु शकता.

स्कूटर्सच्या नव्या रेंजमध्ये ओला गिग, ओला गिग +, ओला एस1 झेड आणि ओला एस1 झेड + चा सहभाग आहे.

Ola Gig - किंमत 39999 रुपये

Ola Gig ला छोड्या राईड्ससाठी डिझाईन करण्यात आलं आहे. यामध्ये रिमूव्हेबल 1.5 kWh बॅटरी देण्यात आली आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 112 किमीची रेंज देईल. ही स्कूटर B2B बिझनेससाठी फायदेशीर आहे.

Ola Gig + - किंमत 49999 रुपये

ही स्कूटर पेलोडसह मोठा पल्ला गाठू शकते. यामध्ये 1.5 kWh बॅटरी देण्यात आली आहे जी 157 किमीची रेंज देते. हिचा टॉप स्पीड ताशी 45 किमी आहे.

Ola S1 Z - किंमत 59999 रुपये

S1 Z ला कंपनीने वैयक्तिक वापराच्या दृष्टीकोनातून डिझाईन केलं आहे. यामध्ये 1.5kWh ची रिमूव्हेबल ड्युअल बॅटरी देण्यात आली आहे, जी 75 किमीची रेंज देते.

Ola S1 Z+ - किंमत 64999 रुपये

Ola S1 Z+ मधेही 1.5kWh ची रिमूव्हेबल ड्युअल बॅटरी देण्यात आली आहे., जी 75 किमीची रेंज देते. हिचा टॉप स्पीड ताशी 70 किमी आहे.

ओला इलेक्ट्रिकचे चेअरमन भाविश अग्रवाल यांनी एप्रिल-मे 2025 पासून या स्कूटर्सची डिविव्हरी सुरु होईल असं सांगितलं आहे.

VIEW ALL

Read Next Story