स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल सेगमेंटमध्ये होंडा कंपनीने यंदाच्या वर्षाचा शेवट आपल्या नवीन मिड साईज एसयूव्ही लॉन्च केला आहे.
होंडा एलिव्हेट असं या नव्या कारचं नाव आहे. या कारने नुकताच एक नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे.
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, ही एसयूव्ही लॉन्च झाल्यानंतर 100 दिवसांमध्ये 20,000 युनिट्सची विक्री झाली आहे.
म्हणजेच रोज देशामध्ये 200 होंडा एलिव्हेटच्या युनिट्सची विक्री होत आहे.
6 स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि सीवीटी ट्रान्समिशनचं इंजिन होंडा एलिव्हेटमध्ये आहे. मॅन्यूअल व्हेरिएंट कार 15.31 किमी प्रती लीटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 16.92 किमी प्रती लीटर मायलेज देते.
होंडा एलिव्हेटमध्ये 40 लीटरचा फ्लूएल टँक देण्यात आली आहे. म्हणजेच एकदा टँक फूल केल्यास मॅन्यूअल व्हेरिएंट 612 किमी आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 679 किमीपर्यंत धावेल.
होंडा एलिव्हेटच्या बेस मॉडेलमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, ऑटेमॅटीक क्लायमेट कंट्रोल, 16 इंचाचं स्टील व्हील आणि ड्युएल फ्रंट एअरबॅग देण्यात आली आहे.
टॉप मॉडेलमध्ये 10.25 इंचांचा टचस्क्रीन, 6 एअरबॅग, होंडा सेसिंग एडीएएस सूट, ऑटो डिमिंग इंटीरिअर डे/नाईट मिरर, 8 स्पीकर, लेदरेट ब्राउन अपहोल्स्ट्री, सॉफ्ट टच डॅशबोर्ड देण्यात आलाय.
होंडा एलिव्हेटमध्ये कंपनीने अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम देण्यात आली आहे. या सेगमेंटमधील ही सर्वोत्तम कार आहे.
मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये केवळ एमजी अॅस्ट्रोचं मॉडेल असं आहे ज्यामध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम देण्यात आली आहे. गाडीच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं ठरतं.
होंडा एलिव्हेटमध्ये कोलिशन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टीम, लेन कीपिंग असिस्ट सिस्टीम, अडॅप्टीव्ह क्रूज कंट्रोल, रोड डिपार्चर मिटगेशन सिस्टीम, लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन, लेनवॉचसारखे फिचर्स आहेत.
होंडा एलिव्हेटला कंपनीने सप्टेंबर महिन्यामध्ये 11 लाख रुपयांच्या इंट्रोडक्टरी किंमतीमध्ये लॉन्च केलं होतं. 2024 पासून या कारची किंमत वाढणार असं कंपनीने जाहीर केलं आहे.