फोनची बॅटरी टिकवून ठेवायची आहे? तर 80:20 नियम करा फॉलो

प्रत्येकालाच फोन चार्ज करण्याच्या वेगवेगळ्या टीप्स माहित असतात.काही लोकांच असं म्हणणं असतं की, फोनची बॅटरी पूर्णपणे संपवून फोन चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य चांगले राहते. पण असे काही नसते.

जर तुम्हाला बॅटरी नेहमी चांगल्या स्थितीत ठेवायची असेल तर तुम्ही हे 80:20 नियम पाळले पाहिजेत.

स्मार्टफोनच्या या जगात आपले आयुष्यादेखील स्मार्ट होत आहे. प्रत्येक कामासाठी फोनची गरज भासत असल्यांने त्याची बॅटरी टीकवून ठेवणे महत्त्वाचे झाले आहे.

जर बॅटरी स्वत:च खराब होऊ लागल्याने फोन देखील खराब होतो. त्यामुळे फोनची बॅटरी योग्यप्रकारे चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य वाढते.

काही लोकांचा या गोष्टीवर विश्वास आहे की, फोनची बॅटरी 0% झाल्यावरच फोन 100% चार्ज करायला हवा. तुम्ही देखील असं करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे.

अशावेळी सर्वोत्तम नियम 20-80 म्हणजेच ज्यावेळी बॅटरी 20 टक्के शिल्लक असेल त्यावेळी ती चार्ज करावी. आणि जेव्हा ती 80 टक्क्यांपर्यंत पोहचेल तेव्हा चार्जिंग बंद करावा.

काही तज्ज्ञांच्या मते बॅटरी 90 टक्क्यांपर्यंत देखील चार्ज केली जाऊ शकते.तुम्ही हा नियम पाळल्यास तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढेल.

जर तुम्ही फोन चार्जिंगला ठेवून वापर करत असाल तर असं करणं टाळा. यामुळे फोनच्या प्रोसेसरवर ताण येतो.

फोन चार्ज करताना कंपनीकडून मिळालेलाच चार्जरच वापरा.

VIEW ALL

Read Next Story