पावसाळयात विंडोस्क्रिनवर वाफ साठत आहे? तर करा 'हे' उपाय

Jul 05,2024


पावसाळ्यात गाडी चालवताना येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे विंडोस्क्रिनवर साठणारी वाफ.


यामुळे गाडी चालवत असताना विंडोस्क्रिनवर डिफ्रॉस्टर स्प्रे वापराल्याने वाफ कमी होण्यास मदत होते आणि आपल्याला समोरचं स्पष्ट दिसतं.

खिडकी थोडी उघडा

विंडोस्क्रिनवर जमा होणारी वाफ ही जरी सामान्या गोष्ट असली तरी त्यापासून बरेच अडथळे येऊ शकतात. अशावेळी हवा खेळती राहणे गरजेचे आहे. खिडक्या पूर्णपणे बंद करणं टाळा.

एअर कंडिशनर वापरा

एअर कंडिशनरचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. जर तुम्ही कारचा एसी नीट वापरला नाही तर तुमच्या कारच्या विंडोस्क्रिनवर जास्त वाफ जमा होईल.यामुळे दृश्यमानता कमी होऊन अपघात होण्याची भीती असते.

रिसर्क्युलेशन मोड बंद करा

रिसर्क्युलेशन मोड बंद ठेवा जेणेकरून हवा आत येऊ शकेल आणि ओलावा बाहेर पडण्यास मदत होईल.काहीवेळेस रीक्रिक्युलेशन मोड देखील वाफ वाढवू शकतो. त्यावेळी हीटर चालू करून विंडोस्क्रिनच्या दिशेने ठेवा. म्हणजे त्यातील गरम हवा ओलावा बाहेर काढण्यास मदत करेल.

डीफॉग मोड वापरा

बऱ्याच कारमध्ये डीफॉग मोड असतो, जो विंडोस्क्रिनवरून वाफ काढून टाकण्यासाठीच डिझाइन केलेला असतो. यामध्ये एसी आणि हीटर दोन्हीचा वापर केला जातो. ज्यामुळे हवा कोरडी होते आणि विंडोस्क्रिनवरून वाफ काढण्यास मदत करते.

VIEW ALL

Read Next Story