Steelbird ने लाँच केलं 'जय श्रीराम' एडिशन हेल्मेट; किंमत किती?

जय श्रीराम एडिशन SBH-34 हेल्मेट

अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठ्या हेल्मेट निर्मात्या कंपन्यांपैकी एक स्टीलबर्ड हायटेक इंडिया लिमिटेडने जय श्रीराम एडिशन SBH-34 हेल्मेट लाँच केलं आहे.

अल्ट्रा-मॉडर्न टेक्नॉलॉजीसह अध्यात्मातेचं मिश्रण

कंपनीचं म्हणणं आहे की, हे स्पेशल एडिशन हेल्मेट अल्ट्रा-मॉडर्न टेक्नॉलॉजीसह अध्यात्मातेचं मिश्रण करत विशेष दिनी लाँच करण्यात आलं आहे.

दोन विशेष रंगात उपलब्ध

SBH-34 जय श्रीराम एडिशन दोन विशेष रंगात उपलब्ध आहे. यामध्ये ग्लॉसी ब्लॅक बोल्ड सॅफरॉन आणि ग्लॉसी ऑरेंज, ब्लॅक डिटेल्ससह उपलब्ध आहे.

भगवान श्रीराम आणि मंदिराचा फोटो

केशरी रंगाच्या हेल्मेटचा लूक आणि डिझाइन एकदम वेगळं आहे. या स्पेशल एडिशनमध्ये भगवान श्रीराम आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराचा फोटो आहे.

संस्कृतीचं प्रतीक

स्टीलबर्डचे व्यवस्थापकीय संचालक राजीव कपूर म्हणाले आहेत की, "हे हेल्मेट फक्त एक प्रोडक्ट नव्हे तर संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यावरील राम आणि अयोध्येचा फोटो आमची श्रद्धा दर्शवतात".

हाय डेंसिटी ईपीएस

चांगली सुरक्षा आणि आराम यासाठी थर्मोप्लास्टिक शेलने तयार केलेल्या या हेल्मेटमध्ये प्रहार सहन करण्यासाठी हाय डेंसिटी ईपीएसचा समावेश आहे.

इंस्टंट रिलीज बकल

पॉलीकार्बोनेट एंटी-स्क्रॅट कोटेड वायजर आणि बॅक रिफ्लेक्टर व्हिजिबिलिटीसह सुरक्षा अजून मजबूत होते. यामध्ये इंस्टंट रिलीज बकलही देण्यात आलं आहे.

सन शील्ड

याशिवाय इनर सन शील्डही सुरक्षा प्रदान करते आणि कोणत्याही ऋतूत, कडक उन्हापासून डोळ्यांना वाचवतं.

किंमत किती?

श्रीराम एडिशन हेल्मेट मीडियम (580 मिमी) आणि मोठ्या (600 मिमी) अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. कंपनीने 1349 रुपयांत हेल्मेट लाँच केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story