स्मार्टफोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाईन दिसायला लागल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. कंपनीने देखील या प्रकरणातून आपला हात काढून घेतल्याचे अनेक प्रकरणात पाहायला मिळालं आहे
गेल्या दीड वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरू आहे. काही बजेट आणि मिडरेंज स्मार्टफोन्समध्ये स्क्रीनवर ग्रीन उभी रेषा दिसू लागली आहे.
ट्विटर-फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी मोबाईल कंपन्यांची नावे टाकून त्यांच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर हिरव्या रेषा दिसत असल्याचा दावा केला आहे. अँड्रॉईड सॉफ्टवेअर अपडेटनंतर असे होत असल्याचे त्यांचे म्हणणं आहे.
वनप्लस, सॅमसंग, Oppo, Vivo, Xiaomi, Motorola, Google यासारख्या कंपन्यांच्या फोनमध्ये अशा तक्रारी येत आहेत.
अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममधील अपडेटनंतर असे होत असल्याचे अनेकांचे म्हणणं आहे. तर एका युजरने सर्व्हिस सेंटरमध्ये ग्रीन लाइनची समस्या सोडवण्यासाठी कर्मचाऱ्याने मोबाईलचा रिफ्रेश रेट 120 Hz वरून 60 Hz केला होता.
डिस्प्ले आणि मदरबोर्डमधील कनेक्शन सैल झाले असल्यास, डिस्प्ले कनेक्टरमध्ये समस्या असल्यास, डिस्प्ले पाण्यात पडल्यामुळे खराब झाल्यास किंवा सिस्टम कॉन्फिगरेशन चुकीचे असल्यास ही समस्या येऊ शकते.
फोन बंद करून पुन्हा चालू करून रीस्टार्ट करा. फोनच्या सॉफ्टवेअरमध्ये तात्पुरता बिघाडामुळे ग्रीन लाइन येत असल्यास, असे केल्याने समस्येचे निराकरण होण्याची शक्यता आहे.
जर सॉफ्टवेअर समस्या असल्यास, तुमचा फोन सेफ मोडमध्ये सुरू करा. सेफ मोड हा एक असा मोड आहे जो आपल्या डिव्हाइसवर लाँच होणाऱ्या आवश्यक गोष्टींशिवाय इतर गोष्टींना रोखतो.
फॅक्टरी रीसेट करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुमच्या Android फोनचा बॅकअप घेतल्याची खात्री करा. (सर्व फोटो - ट्विटर)