हवा, पाणी आणि अन्न या मुलभूत गरजांबरोबरच आता मोबाईल देखील माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.
आताच्या जमान्यात मोबाईलशिवाय आपलं जगणं अपूर्ण आहे. देशात जवळपास 72 कोटी लोकं मोबाईलचा वापर करतात.
मोबाईलमुळे संपूर्ण जगाची माहिती मिळतेच शिवाय दैनंदिन कामंही आता मोबाईलच्या एका क्लिकवर करणं सोप झालं आहे.
पण तुम्हाला माहित आहे का मोबाईल फोनचा शोध कोणी लावला. पहिला मोबाईल कधी बनला होता?
जगातील पहिल्या मोबाईल फोनचा शोध मार्टिन कूपर यांनी 3 एप्रलि 1970 रोजी लावला. यावेळी त्यांनी एका पत्रकार परिषदेत डायनाटेक फोन सादर केला होता.
मार्टिन कूपर हे अमेरिकन इंजिनिअर आहेत. त्यांनी पहिल्या मोबाईलने बेल लॅब्सच्या जोएल अस एंजेलला पहिला फोन केला होता.
मार्टिन कूपर यांनी मोबाईल कंपनी मोटोरोलाबरोबर या फोनची निर्मिती केली. त्यावेळी एक चार्जमध्ये मोबाईल फोनवर 35 मिनिटांपर्यंत बोलता येत होतं.