फोनमध्ये असलेलं फ्लाइट मोड करेल तुमच्या 'या' समस्या दूर

Sep 27,2024


जेव्हा आपण फ्लाइटने प्रवास करतो तेव्हा फोनचा फ्लाइट मोड चालू करण्याचा सल्ला दिला जातो.


पण तुम्हाला माहित आहे का की फोनमध्ये असलेल्या हा फ्लाइट मोड खूप उपयुक्त आहे.


फ्लाइट मोडच्या मदतीने तुम्ही काही समस्या क्षणार्धात सोडवू शकता.


फ्लाइट मोडच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी वाचवू शकता. होय, कारण फ्लाइट मोड चालू केल्याने वायरलेस कनेक्शन थांबते.


फोन फास्ट चार्ज करण्यासाठी तुमच्या फोनचा फ्लाइट मोड चालू करा यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होईल.


तुम्ही फ्लाइट मोड चालू केल्यास तुमची उत्पादकता वाढवू शकता. कारण फ्लाइट मोड सुरु केल्याने कॉल, मेसेजपासून तुमचे लक्ष विचलित होत नाही.


तुमच्या फोनचे नेटवर्क नीट काम करत नसल्यास, तुम्ही फ्लाइट मोड चालू करून तुमचे नेटवर्क रीसेट करू शकता. (All Photos Credit: Pixabay, Freepik)

VIEW ALL

Read Next Story