ऑगस्ट महिन्यात कंपन्यांनी अनेक गाड्या बाजारात लाँच केल्या. यावेळी काही कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली तर काहींना मात्र मोठा फटका बसला.
टाटा आणि हुंडई यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी जोरदार स्पर्धा सुरु आहे. देशात सर्वाधिक गाड्या कोणत्या कंपनीने विकल्या हे जाणून घ्या.
Volkswagen साठी ऑगस्ट महिना फार चांगला राहिला. या महिन्यात कंपनीने एकूण 4174 वाहनांची विक्री केली. मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीत 102 टक्के वाढ झाली आहे.
नवव्या क्रमांकावर MG Motor आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यात एकूण 4185 वाहनांची विक्री केली. मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीत 9.5 टक्के वाढ झाली आहे.
आठव्या क्रमांकावर स्कोडा असून, 2 टक्क्यांच्या वाढीसह कंपनीने 4307 वाहनांची विक्री केली आहे.
होंडाने ऑगस्ट महिन्यात 7880 युनिट्सची विक्री केली. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात 7769 युनिट्सची विक्री झाली होती.
सहाव्या क्रमांकावर Kia-India आहे. कंपनीच्या विक्रीत 13.9 टक्क्यांची घट झाली आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यात एकूण 19 हजार 219 गाड्यांची विक्री केली आहे.
टोयोटाने मोठी झेप घेतली असून पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या एकूण 20 हजार 970 युनिट्सची विक्री झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही 40 टक्के वाढ आहे.
महिंद्रा चौथ्या क्रमांकावर आहे. महिंद्राच्या 37 हजार 270 युनिट्सची ऑगस्ट महिन्यात विक्री झाली आहे.
टाटा मोटर्स पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यात 45 हजार 515 युनिट्सची विक्री केली आहे. टाटाच्या विक्रीत 3.5 टक्के घट झाली आहे.
हुंडईने आपला दुसऱा क्रमांक कायम ठेवला आहे. ऑगस्ट महिन्यात एकूण 53 हजार 830 युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीच्या विक्रीत 8.7 टक्क्यांची वाढ झाली आहे.
नेहमीप्रमाणे मारुती सुझुकीने आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. 16.4 टक्के वाढीसह कंपनीने ऑगस्ट महिन्यात एकूण 1 लाख 56 हजार 114 युनिट्सची विक्री केली आहे.