हाडांचा ठिसूळपणा कमी करतील 'ही' पाच फळे!

हेल्दी लाइफस्टाइलसाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे शरीर निरोगी असणे. अलीकडे जेवणाच्या बदलत्या सवयीमुळं हाडं कमजोर होत आहेत. यामुळं भविष्यात आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

Mansi kshirsagar
Sep 05,2023


हाडांचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात या पाच फळांचा समावेश करा. यामुळं हाडांना बळकटी मिळू शकते.

सफरचंद

सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरची अधिक मात्रा असते. तसंच, त्यात अँटीऑक्सिडेंट गुणधर्मही आढळतात. त्यामुळं ऑस्टियोपोरोसिस रोखण्यास मदत होतो.

डाळिंब

डाळिंबात कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के अशी गुणधर्म आढळतात. तसंच, हाडांना बळकटी देणारे अँटीऑक्सिडेंटदेखील आढळतात.

केळ

केळ्यात पोटॅशियम आणि मॅग्शिशियमचा चांगला स्त्रोत आहे. पोटॅशियम हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर, मॅग्निशियम कॅल्शियमम खेचून घेण्यास मदत करते.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन केचा उत्तम स्त्रोत आहे. स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडेंटदेखील असते. जे ऑस्टियोपोरोसिस रोखण्यास मदत करते.

किवी

कीवीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमीन केचा चांगला स्त्रोत असतो. कॅल्शियम हाडांच्या बळकटीसाठी चांगले असते. व्हिटॅमिन सी कोलेजनच्या उत्पादनासाठी मदत करते. जे हाड बळकट करण्यात मदत करते आणि व्हिटॅमिन के रक्तातील कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते.

VIEW ALL

Read Next Story