ही यादी पाहून छाती अभिमाने फुलून येईल

टेस्लाने आज एका भारतीयाची नियुक्ती फार महत्त्वाच्या पदावर केलीय. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचं नेतृत्व भारतीय करतात. हे भारतीय कोण आणि ते कोणत्या कंपन्यांचं नेतृत्व पाहतात पाहूयात..

टेस्लामध्ये भारतीयाची उच्च पदावर नियुक्ती

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या टेस्लाने व्यक्तीवर एक प्रमुख जबाबदारी सोपवली आहे.

वैभव तनेजांकडे टेस्लाकडून महत्त्वाची जबाबदारी

एलन मस्क यांच्या मालकीच्या 'टेस्ला'ने भारतीय वंशाच्या वैभव तनेजा यांची चीफ फायनॅनशिएल ऑफिसर म्हणजेच सीएफओ म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय

वैभव हे काही पहिले भारतीय नाहीत

एवढ्या मोठ्या पोस्टवर नियुक्ती झालेले वैभव तनेजा हे काही पहिलेच भारतीय नाही. अनेक कंपन्यांची धूर सध्या भारतीयांची हाती आहे. पाहूयात अशाच काही भारतीयांबद्दल...

सुंदर पिचाई

गुगल आणि अल्फाबेट कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले सुंदर पिचाई हे 2004 पासून या कंपनीबरोबर काम करतात. पिचाई 2015 पासून गुगलचे तर 2019 पासून अल्फाबेटचे सीईओ म्हणून काम पाहतात.

सत्या नाडेला

सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते 2014 पासून सीईओ आहेत.

वसंत नरसिम्हा

जगातील सर्वात मोठी औषधनिर्मिती कंपनी असलेल्या नोव्हार्तीस कंपनीचे नेतृत्व 2018 पासून वसंत नरसिम्हा करत आहेत.

शंतनू नारायण

जगप्रसिद्ध अ‍ॅडोर्ब कंपनीचं नेतृत्वही भारतीय व्यक्तीचं करते. शंतनू नारायण हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. ते 1998 पासून कंपनीत कार्यरत असून 2007 ला सीईओ तर 2017 मध्ये अध्यक्ष झाले.

अरविंद कृष्णा

जगप्रसिद्ध आयएमबी या आयटी क्षेत्रातील कंपनीचे नेतृत्व अरविंद कृष्णा करतात. मागील 30 वर्षांपासून ते या कंपनीत कार्यरत असून ते 2020 ला सीईओ तर 2021 मध्ये कंपनीचे अध्यक्ष झाले.

लक्ष्मण नरसिम्हा

या यादीमध्ये नव्याचे समावेश झालेल्या सीईओंमध्ये लक्ष्मण यांचं नाव येतं. ते स्टारबर्कचे मुख्य कार्यकारी असून त्यांची नियुक्ती मार्च 2023 मध्ये झाली.

निकेश अरोरा

निकेश अरोरा यांनी पालो अल्टो नेटवर्क या कंपनीमध्ये 2018 पासून काम करण्यासा सुरुवात केली. सॉफ्ट बँकमधील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते सीईओ आणि अध्यक्ष म्हणून पालो अल्टो नेटवर्कमध्ये जॉइन झाले.

VIEW ALL

Read Next Story