WhatsApp वर चुकूनही ऑन करु नका हे फिचर; एका सेकंदात बँक खातं होईल रिकामं

WhatsApp हे आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालं आहे. कुटुंबापासून ते ऑफिसपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याची गरज भासते.

अॅपला युजर फ्रेंडली करण्यासाठी कंपनी सतत त्यामध्ये अपडेट करत असते. पण अनेकदा याच फिचर्सचा वापर स्कॅम करणारेही करतात.

यावेळी WhatsApp ने स्क्रीन शेअरिंगचं फिचर आणलं आहे. याच्या आधारे युजर आपली स्क्रीन दुसऱ्या युजरसोबत शेअर करु शकतो.

याचसह समोरील युजरला तुमच्या स्क्रीनचा अॅक्सेस मिळेल. पण एखाद्या अज्ञात व्यक्तीसह स्क्रीन शेअर केल्यास तुम्हाला महाग पडू शकतं.

स्कॅमर्स आतापर्यंत ओटीपी आणि इतर माहितीच्या आधारे फसवत होते. पण या फिचरचा वापर करताना त्यांना ओटीपी मागावा लागणार नाही, तर थेट पाहता येईल.

अनेकांना याच्या माध्यमातून फसवल्याची प्रकरणं समोर आली आहेत. काहींच्या तर सोशल मीडियाचा अॅक्सेसही त्यांनी मिळवला आहे.

या जाळ्यात अडकायचं नसेल तर सर्वात प्रथम अज्ञात क्रमांकावरुन येणारे व्हिडीओ, वॉइस कॉल अजिबात उचलू नका.

जर एखादी अज्ञात व्यक्ती तुम्हाला स्क्रीन शेअर करण्यास सांगत असेल तर अजिबात करु नका. त्यांनी पाठवलेली विनंती स्विकारु नका.

आपल्या पासवर्डची माहिती कोणालाच देऊ नका. कधीही कोणासोबत ओटीपी, क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर आणि CVV सारख्या डिटेल्स शेअर करु नका.

स्क्रीन शेअरगिंचं फिचर युजर्सला रिमोटली तुमच्या फोनचा अॅक्सेस देऊ शकतं. याच्या आधारे स्कॅमर्स तुमचे पासवर्ड, अॅपचा अॅक्सेस आणि ओटीपी मिळवू शकतात.

VIEW ALL

Read Next Story