पैसेवाले लोक मोबाईलला कव्हर का लावत नाहीत?
Mobile Phone : नवा मोबाईल हातात आल्यानंतर त्याला स्क्रीनगार्ड लावण्यापासून कव्हर घालण्यापर्यंतची सर्व का ळजी अनेकजण घेतात. पण, तुम्ही अशी काही धनाढ्य मंडळी पाहिली असतील जी कधीच असं काही करताना दिसत नाहीत.
Tech News : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्यापासून फेसबुरक/ मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गही त्यांच्या स्मार्टफोनला कव्हर वापरत नाहीत.
आयफोन असो किंवा आणखी कोणता महागडा फोन, अनेकदा या अब्जाधीशांना कव्हर नसलेला फोन वापरताना पाहायला मिळालं आहे.
तुम्हाला माहितीये का, स्मार्टफोनला कव्हर न घालण्याचेही काही फायदे आहेत. ज्याचा श्रीमंतीशी तसा थेट संबंध नाहीच.
कव्हर नसणारा स्मार्टफोन व्यवस्थित काम करतो. कव्हर लावल्यामुळं फोनच्या नेटवर्क अँटिना बँडमध्ये व्यत्यय येतो आणि त्याला नेटवर्क मिळत नाही.
फोनला कव्हर न घातल्यामुळं त्याचं डिझाईनही लपून जातं. शिवाय तो मोठाही दिसू लागतो.