जगातील कोट्यवधी कॉम्प्युटर होणार 'भंगार', संपून जाणार 'हा' सपोर्ट

Pravin Dabholkar
Jan 10,2025


मायक्रोसॉफ्टची 10 वर्षे जुनी ऑपरेटिंग सिस्टिम विंडो 10 चा सपोर्ट यावर्षी संपणार आहे.


या ऑपरेटिंग सिस्टिमचा सपोर्ट 14 ऑक्टोबर 2025 ला संपेल. देशातील कोट्यवधी कॉम्प्युटर्सना सिक्योरिटी अपडेट मिळणं बंद होईल.


तुम्ही या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करु शकणार नाही. तुम्ही काम करु शकाल पण तुम्हाला कोणते अपडेट मिळणार नाही.


याचा अर्थ तुम्ही रिस्क झोनमध्ये असून हॅकर्सच्या निशाण्यावर असू शकता.


या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांनी लवकरात लवकर विंडोज किंवा इतर ऑपरेटिंग सिस्टिमवर अपडेट करायला हवे.


मायक्रोसॉफ्ट यूजर्स विंडो 10 साठी एक्सटेंडेड सिक्योरीटी अपडेट प्रोग्राम निवडू शकतात. यानुसार त्यांना 1 वर्षापर्यंत सिक्योरीटी अपडेट मिळत राहीलं.


तुमचे कॉम्प्युटर हार्डवेअर विंडो 11 साठी तयार नसेल तर Linux किंवा दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टिमवर अपग्रेड करु शकता.


यूजर्सना क्रोम ओएस फ्लेक्सचा पर्यायदेखील मिळतो. तुम्ही तुमचा लॅपटॉप क्रोम ओएसवर अपडेट करु शकता.


फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, जगभरात विंडोज 10 च्या अॅक्टीव्ह यूजर्सची संख्या 80 कोटींच्या आसपास आहे. विंडोज 11 च्या यूजर्सची संख्या 43.5 कोटी इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story