Periods दरम्यान 'या' 9 चुका कधीच करू नका, जाणून घ्या दुष्परिणाम

Dec 19,2024

जेवणे टाळू नका

अनेकदा पीरियड्सच्या वेळी मळमळ होण्याची समस्या जाणवते. यामुळे जेवण्याची इच्छा होत नसते पण, भुकेमुळे ऊर्जेची कमतरता किंवा डोकेदुखी होऊ शकते.

कॉफी किंवा चहा

पीरियड्सच्या वेळी खूप जास्त प्रमाणात कॉफी किंवा चहा प्यायल्यने ब्लोटिंग आणि डिहाइड्रेशन होऊ शकते. त्या ऐवजी तुम्ही कोमट पाणी किंवा ग्रीन टी घेऊ शकता.

'या' गोष्टीसाठी आळस नको

साधारणपणे 4 तासांच्या अंतरात पॅड बदलून घेतला पाहिजे, दिवसभर एकच वापरल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका उद्भवतो.

जास्त वर्कआउट

पीरियड्समध्ये वॉक शिवाय कोणतेही थकवा येईल असे वर्कआउट करणे टाळावे.

पाणी पित रहा

गरजेपेक्षा कमी पाणी प्यायल्याने ऊर्जेची कमतरता, ब्लोटिंग आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे नियमित पाणी प्या. पाणी शक्यतो कोमट करुन प्या.

जास्त वेदना होत असतील तर...

पीरियड्सच्या वेळी जास्त वेदना होत असतील तर गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्या. खूप जास्त प्रमाणात वेदना होत असल्यस डॉक्टरांशी संपर्क साधा.

जंक फूड

जास्त तेलकट किंवा सोडा ड्रिंक असे पदार्थ खाणे-पिणे टाळावे. जंक फूडमुळे वेदना वाढतात.

अनियमित झोप

उशिरा झोपणं हार्मोनल संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे पोटात कळ येण्याचा त्रास होतो.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story