शेरा देण्यासाठी शिक्षक लाल रंगाच्या शाईचाच पेन का वापरतात?

Sayali Patil
Dec 19,2024

शैक्षणिक आयुष्य

शाळा असो वा महाविद्यालयं. शैक्षणिक जीवनामध्ये सहसा अभ्यासादरम्यान काहीही लिहायचं झाल्यास अनेकदण काळ्या किंवा निळ्या शाईचाच पेन वापरतात.

अपवाद

इथं अपवाद असतात ते म्हणजे शिक्षक. विद्यार्थ्यांप्रमाणं ते शेरा देण्यासाठी किंवा वही, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी फक्त आणि फक्त लाल रंगाच्याच शाईचं पेन वापरतात. पण असं का?

तर्क

मुळात या वापरामागे कोणतंही लिखित कारण नाही. पण, याविषयी काही तर्क मात्र सतत लावले जातात.

ठळक अक्षर

त्यातील एक म्हणजे कागद पांढरा असल्यामुळं त्यावर विद्यार्थी जे काही लिहितात ते काळ्या आणि निळ्या शाईत ठळकपणे दिसतं.

पेनचा वापर

असं म्हणतात की, शिक्षकांसाठी लाल रंगाच्या पेनचा वापर सोयीचा ठरतो. जेणेकरून त्यांनी दिलेला शेरा विद्यार्थ्यांना स्पष्टपणे लक्षात येईल.

गांभीर्य

लाल रंगाला गांभीर्य आणि जबाबदारीचं प्रतीक म्हणून इथं ग्राह्य धरलं जातं. त्यामुळं विद्यार्थी या लाल रंगात मिळालेल्या शेऱ्याचा विचार गांभीर्यानं करतात.

हाय ड्युरेबलिटी

काळ्या आणि निळ्या रंगाच्या शाईमध्ये हाय ड्युरेबलिटी असते. काळ्या आणि निळ्या शाईवर इतर कोणतेही घटक फारसा परिणाम करत नाहीत.

VIEW ALL

Read Next Story