वटपौर्णिमेची पूजा करतांना कोणते मंत्र म्हणावे?

Jun 20,2024


हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात पौर्णिमा आणि अमावस्या येते.


धर्मशास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमाचे विशेष महत्त्व आहे.


यंदा ज्येष्ठ वट पौर्णिमा ही 21 जून 2024 ला साजरी करण्यात येणार आहे.


21 जूनला पहाटे 5.24 मिनिटांपासून सकाळी 10.30 मिनिटांपर्यंताचा आणि दुपारी 12.23 वाजेपासून 2.27 मिनिटांपर्यंत पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे.


हिंदू धर्मात वटपौर्णिमेला खूप महत्व आहे. यादिवशी विवाहीत स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळी उपवास करून वटवृक्षाला सात प्रदक्षिणा मारतात.


वटवृक्षाला प्रदक्षिणा मारत धागा गुंडाळताना मंत्राचा जप केला जातो. पुढची सात जन्म हाच पती मिळावा यासाठी हे व्रत केले जाते.


हिंदूशास्त्रानुसार 'स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः ! वटाग्रे तू शिवो देवःसावित्री वटसंश्रिता !! या मंत्राचा जप केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं शास्त्रात सांगण्यात आलंय.

VIEW ALL

Read Next Story