प्रभावी पासपोर्टच्या यादीत भारताचं नाव 80 व्या स्थानावर आहे. तुमच्याकडे भारताचा पासपोर्ट असल्यास 57 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येतो.
प्रभावी पासपोर्टच्या यादीत दहाव्या स्थानी आईसलँड, एस्टोनिया या देशांच्या पासपोर्टचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून 182 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाता येतं.
स्लोव्हाकिया, लातविया, स्लोवेनिया या देशांचा पासपोर्य या यादीत नवव्या स्थानावर आहे. ज्यामुळं तुम्हाला 183 देशांमध्ये प्रवास करता येतो.
यादीतील आठवं स्थान युनायेड स्टेट्स, लिथुआनिया या देशांच्या पासपोर्टना आहे. ते असल्यास 184 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करता येतो
कॅनडा, ग्रीस या देशांचा पासपोर्ट यादीत सातव्या स्थानी आहे. या पासपोर्टमुळं 185 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाता येतं.
यादीत सहाव्या स्थानावर ऑस्ट्रेलिया, हंगेरी, पोलंड या देशांचा पासपोर्टचा समावेश आहे. हे पासपोर्ट असल्यात अमुक व्यक्ती 186 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकतात.
चेक रिपब्लिक, माल्टा, न्यूझीलंड, नॉर्वे, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड या देशांच्या पासपोर्टला यादीत पाचवं स्थान आहे. हे पासपोर्ट असल्यास त्या व्यक्तीला 187 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करणं शक्य होतं.
डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड आणि युके या देशांच्या पासपोर्टचा चौथ्या स्थानावर समावेश असून, ही मंडळी 188 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात.
यादीत तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रिया, फिनलँड, लक्झमबर्ग, दक्षिण कोरिया, स्वीडन आणि जपानचा समावेश आहे. या पासपोर्टच्या मदतीनं तुम्ही 189 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करु शकता.
प्रभावी पासपोर्टच्या यादीत दुसऱ्या स्थानावर स्पेन, इटली, जर्मनी या देशांचा समावेश असून, त्यांचे पासपोर्ट असल्यास तुम्ही 190 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करु शकता.
या यादीत पहिल्या स्थानावर सिंगापूरचा समावेश असून, तुम्ही त्याच्या बळावर 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करु शकता.