कधी सेक्स किंग कधी अय्याशीत जगणारा, पोलिसांना पैशांनी भरलेल्या पिशव्या देणारा थायलंडमधील चुविट कामोलविजिट पुन्हा चर्चेत आला आहे.
जगात सेक्स किंग म्हणून ओळखला जाणारा चुविटला मात्र थायलंडमधील लोकं भ्रष्टाचार संपवणारा हिरो समजतात. त्याने अनेक वर्ष अवैध धंद्यातच काळा पैसा जमा केला. त्याच्या या दोन नंबरच्या धंद्यातून त्याने थायलंडमधील पोलीसही त्याच्या हातातील बाहुले होते.
त्याने काळा धंदा चालविण्यासाठी पोलिसांना पिशव्या भरुन पैसा दिला. रोलेक्स घड्याळं, मसाज पार्लरमधील मुली त्याने पोलिसांना पाठवल्या. त्याने जवळपास 1 हजारापेक्षा जास्त पोलिसांना आपल्या खिशात ठेवलं होतं.
आलिशान महालात राहणारा सेक्स किंग चुविटला 2003 मध्ये पोलिसांना अटक करुन तुरुंगात टाकलं.
जेव्हा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चुविटने टीव्ही शोवर आपली आपबीती सांगितली. याचा आयुष्यातील वास्तव त्याने जगासमोर मांडलं होतं. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला.
त्याने स्वत:चा वेगळा पक्ष काढला. एवंढच नाही तर 2005 मध्ये तो खासदारही झाला. त्यामुळे सेक्स किंग या ओळखीनंतर त्यांची भ्रष्टाचाराचा विरुद्ध लढणारा नायक म्हणून ओळख निर्माण केली.
त्याने आतापर्यंत केलेल्या गुन्हाबद्दल त्याला पश्चाताप होतो आहे. त्याला कॅन्सर झाला असून तिसऱ्या टप्प्यावर आहे. वेश्याव्यवसायातून त्याने कोट्यधीश रुपये कमावले पण त्याच्याकडे पश्चातापाचं दु:ख आहे.