झिका

पुण्यात 'झिका' विषाणूचा शिरकाव; पाहा काय आहेत या संसर्गाची लक्षणं

रक्ताचे नमुने

पुण्याची या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात येणार आहेत. या दरम्यान झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

झिकाचा संसर्ग

पुण्यात झिकाचा संसर्ग झालेल्या सर्वांची प्रकृती आता सुधारत असून त्याला आता कोणताही धोका नाही, असं यंत्रणांनी स्पष्ट केलं असलं तरीही काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

झिकाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतरच पुणे महापालिकेकडून आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या.

विषाणूजन्य आजार

झिका हा एक विषाणूजन्य आजार, हा विषाणू फ्लॅव्हिव्हायरस प्रजातीचा आहे. एडिस इजिप्ती डासामार्फत संसर्ग असणारा हा डास दिवसा चावतो.

डेंग्यू, चिकुनगुनिया

डेंग्यू, चिकुनगुनियासारखे कीटकजन्य आजारही या डासांच्या माध्यमातून पसरतात.

लक्षणं

ताप, अंगावर पुरळ येणे, थकवा, डोकेदुखी, सांधेदुखी ही या संसर्गाची प्राथमिक लक्षणं आहेत. त्यामुळं नागिरकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

VIEW ALL

Read Next Story