तुम्ही कधी बाहेर फिरण्यासाठी गेलात की सगळ्यात पहिले राहण्याची व्यवस्था कुठे चांगली असेल हे पाहता. चांगले हॉटेल्स शोधून काढतात.
हॉटेलचे बुकिंग करत असताना दोन गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपली सोय आणि बजेट हे पाहून हॉटेल निवडले जातात. पण तुम्हाला माहितीये का जगातील काही असे हॉटेल आहेत ज्याचे एक दिवसाच्या रेंटमध्ये तुम्ही बंगला खरेदी करु शकता
जगातील सगळ्यात महागड्या हॉटेलच्या यादीत सेंट लूसिया हॉटेलचा पहिला नंबर आहे. लूसिया हे एक सबमरीन हॉटेल असून पानबुडी नुमा पाण्यात असलेल्या या हॉटेलपर्यंत घेऊन जाते.
या हॉटेलमध्ये साउंडप्रुफ खोल्या असून यात एका रात्रीसाठी 2 कोटी 17 लाख रुपये रेंट घेतले जाते.
जगातील दुसरे सगळ्यात महाग हॉटेल आहे फिजी येथील कोकोमो प्रायव्हेट आयलँड आहे. इथे व्हिला, घर, यॉटसह अन्य सुविधाही आहेत. या हॉटेलमध्ये एकावेळेस फक्त 40 गेस्टनाच थांबवले जाते. इथे एका रात्रीसाठी 10 मिलियन अमेरिकन डॉलर इतकं रेंट घेतलं जाते.
जगातील तिसरे सगळ्यात महागडे हॉटेल लास वेगासमधील पाम्स कॅसीनो रिसॉर्ट हे असून ज्याचे रेंट एका दिवसासाठी 88 लाख रुपये आहे.
जगातील चौथे सगळ्यात महागडे हॉटेल न्यूयॉर्कमधील द मार्क हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी 75 लाख रुपये भरावे लागतात.
जगातील पाचवे महागड्या हॉटेलचे नाव जिनेवामध्ये प्रेजिडेंट विल्सन आहे. याचा एका दिवसासाठी भाडे 70 लाख रुपये इतके आहे.